क्षितिजापलीकडची वाट
क्षितिजापलीकडची वाट
मी शोधतोय
माझ्या स्वप्नातील
ध्येयाकडे घेवून जाणारी
शितीजा पलीकडची वाट
मी शोधतोय गौतमी वृक्ष
आणि शांतीचा मार्ग दाखवणारा तो बुद्ध
ईथे सुरू आहे माणसाची
माणसा विरूद्ध लढाई
माजलाय अमानुषतेचा उद्रेक
निशब्द आक्रोश ऐकतोय मी
आणि विनंती करतोय
एका परिवर्तनाच्या प्रलयासाठी
या महासागराला
अरे सारस्वतांनो
कोणीही देह त्याग
करू नये म्हणून
तुमच्या विचारामधुन
आणि लेखणि मधील शाईच्या प्रत्येक थेंबाने
हाणून पाडा विध्वंसकाचे कुटील डाव
मगच घडु शकतो
नव्या इतिहासाने सुजलाम सुफलाम
शांतीचा देश
