STORYMIRROR

Somesh Kulkarni

Romance

3  

Somesh Kulkarni

Romance

कसोटी

कसोटी

1 min
29.9K


खरंच,इतका चांगला नव्हतो मी,पण इतका वाईटही नाहीये. 

तुझ्या चेहऱ्यावरचं हसू टिकवण्यासाठी 

मी स्वतःच्या भावनांचा दिलेला बळी वाया गेलेला नाहीये.

भीती वाटते कधी कधी घडेल ते स्वीकारण्याची,

अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या माझ्यासारख्या तत्त्ववेत्त्याची 

तत्त्वांशी केलेली तडजोड वाया गेलेली नाहीये. 

गाठीभेटींमधला निष्कर्ष आठवेनासा झालाय,

गुलाबाच्या फुलांनी काट्यांशी केलेली मैत्री वाया गेलेली नाहीये.

आपल्याला जोडणारे दुवे सापडतात आजही,

तुझ्यासाठी त्यांच्यासोबत त्याच वळणावर वाट पाहत थांबणं वाया गेलेलं नाहीये.

तुझ्या होकारातील नकार-नकारातील होकार आजही मन हेलावून टाकतो,

एकमेकांची समजूत काढायला भेटीसाठी बोललेलं खोटं वाया गेलेलं नाहीये. 

आज तुला डोळे भरून पाहतोय मी,

की पाहिल्यावर डोळे भरून आलेत कुणास माहित?

तू अन तुझ्या अश्रूंच्या येण्याने माझं कायमच थांबवलेलं जाणं वाया गेलेलं नाहीये.

शब्दांपेक्षा इशार्यांनी चाललेला सारीपाट मोडला असला तरी ,

तुझ्या अदांच्या मोहपाशात अडकून स्वतःला बंदिस्त करून घेणं वाया गेलेलं नाहीये. 

कारण तू माझी, मी तुझा या समजुतीपलीकडल्या 

समाजाच्या बंधनात अडकवलेले माझे संस्कारी विचार

तुझ्या नैतिकतेच्या भयाच्या वर्तणुकीने वाया गेलेले नाहीयेत.

कदाचित एकमेकांमुळे आपण वाया गेलेलो नाहीयोत.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance