कसं ग जमतं तुला
कसं ग जमतं तुला
सांग ना प्रिये कसं ग जमतं तुला,
मनातलं सारं काही ओळखायला.
लपवून चेहरा हाताच्या आडोशाला,
गालातल्या गालात खुदकन हसायला.
दुसऱ्याच्या डोळ्यातील भाव कळायला,
मनापासून प्रेमात त्याच्या पडायला.
नको नको म्हणत मिठीत यायला,
अन अबोल प्रेमाचा स्वीकार करायला.
सांग ना प्रिये कसं ग जमतं तुला,
मी असतानाही स्वतःला आवरायला.

