मनी तु ध्यानी तु******
मनी तु ध्यानी तु******
मनी तू ध्यानी तू
स्वप्नी तू माझ्या
कळत नसेल प्रेम माझं
तर विचार मनाला तुझ्या
लाजलेला मुखडा तुझा
डोळ्यासमोरून हटेना
अडखळलेल्या पावलांनाही
तुला सोडुन जावेना
एकदाच डोकावून डोळ्यात
बघना तू माझ्या
दिसतील तुला साऱ्या
आठवणी त्या प्रणयाच्या
मनात माझ्या भरलीस ग
पण डोळ्यात तू मावेना
भिरभिरत्या मनाला माझ्या
तुझ्या वाचुन रहावेना
थंड हवा फुलवते
जाणीवा तुझ्या स्पर्शाच्या
विसरलीस कशी तू
आठवणी त्या मिलनाच्या
तू नाहीस आणि
काहीच मनाला भावेना
तुझ्या वाटेवर नजर माझी
चैन डोळ्या पडेना
राणी तू , गाणी तू
कहाणीत तू माझ्या
कळत नसेल प्रेम माझं
तर विचार मनाला तुझ्या

