सांग राणी सांग
सांग राणी सांग
सांग राणी सांग माझ्या कानात काय
मी तुझ्या डोक्यात हाय की मनात हाय
प्रेमात झालो राणी वेडा पिसा
तुझ्यासाठी राणी झाला मोकळा खिसा
मोकळा खिसा करून तू केलंस बाय...
तुझं गोड गोड रुपडं मनात ठसलं
प्रेमाचं पाखरू गाली खुदकन हसलं
हसलं पण काळजात फसलं नाय...
दिसायला बाहुली मलाच गावली
सांग देवा सांग हिला मला का दावली
तुला पाहून पाहून डोळे झाले फ्राय...
तुझी नखरेल चाल झाले पाहून हाल
वाट पाहून थकलो मी आज उद्या काल
दिसं सारा असाचं निघून जाय....
प्रेमात पडून तुझ्या मी झालो सेफ्टी
तुला पटवण्याची मी मारली फिप्टी
तुझ्या माझ्या प्रेमाचा सामना झाला टाय...
सांग राणी सांग माझ्या कानात काय
मी तुझ्या डोक्यात हाय की मनात हाय...

