STORYMIRROR

Sanjay D. Gorade

Romance Others

3  

Sanjay D. Gorade

Romance Others

पार

पार

1 min
11.9K

गाववेशी स्वागताला

उभा पिंपळाचा पार

पारावरून दिसायचे

माझ्या प्रियेचे ते घर


गर्द हिरवा पिंपळ

जसा प्रीतीची बहार

पाहताची फुलायचा 

मनात गुलमोहर 


तिष्ठायचो प्रतीक्षेत 

कित्येक अष्टोप्रहर 

क्षणभर दिसताची

व्हायचो हिरवागार 


तिचे दुर्मिळ दर्शन

मनी फुलवा वसंत

स्वप्नांच्या हिंदोळ्यावर 

वाटे तोकडा आसमंत


पिंपळ पान नि पान

जणू प्रेमाचे प्रतीक 

निरखून पहा जसे

माझे काळीज सटीक 


गाववेशीचा तो पार

कोणी केला हद्दपार

प्रेम अपेशाचा सल

आठव बोचतो फार 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Sanjay D. Gorade

पार

पार

1 min वाचा

बा

बा

1 min वाचा

Similar marathi poem from Romance