बा
बा
1 min
169
तुझ्या मंदिरी तुझाच नाही प्रभाव देवा
मुकाट बसून पाहणे तुझा स्वभाव देवा
माता-भगिनी लुटली जाते तुझ्या द्वारी
वर अब्रूचा केला जातो बनाव देवा
कच्च्या कळ्या खुडतात किती निर्दयीपणे
दानवांपुढे कसा लागेल निभाव देवा
सत्ताधीशच अत्याचारी पाठी दिसते
कायद्याला मानत नाही दबाव देवा
आस्था आहे ना आपुलकी दुसऱ्याप्रती
माणुसकीचा लोकांत दिसे अभाव देवा
संकटकाळी कृष्ण होऊन ये मदतीला
तेव्हा राहिल उरी भक्तीचा लगाव देवा
