Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance

4.0  

Rakesh More

Romance

दोघांची मने वितळून एक झाली

दोघांची मने वितळून एक झाली

1 min
11.6K


आपल्या दोघांची मने 

वितळून एक झाली 

आजच मला याची 

सखे प्रचिती आली ||0||


तुझंच गायलेलं गाणं 

पाठलाग माझा करतं 

दिसतं तुझंच चित्र 

सर्वत्र ओझरतं 

दृष्टी माझी तूझ्या 

देखाव्यात नहाली 

आजच मला याची 

सखे प्रचिती आली ||1||


तुझ्या नावाचा सखे 

उल्लेख आज झाला 

वलय माझ्या हृदयी 

तुझ्याच नावाला 

तुझ्याविना वाटतं 

जग खाली खाली 

आजच मला याची 

सखे प्रचिती आली ||2||


तुझ्याच पेहेरावात 

कोणीतरी दिसतं 

वाटतं तूच आहेस 

आणि मन फसतं 

अस्तित्व जाणवतं

तुझंच भोवताली 

आजच मला याची 

सखे प्रचिती आली ||3||


असं वाटतंय माझ्या 

कवेत तू आहेस 

श्वास घेतोय त्या 

हवेत तू आहेस 

तुझा स्पर्श जाणवतोय 

हृदयी आणि गाली 

आजच मला याची 

सखे प्रचिती आली ||4||


फुलात तुझा चेहरा 

खुणावतो मला 

सुगंधही तोच आहे 

तुझ्या केसातला 

तुझ्या आठवणीने

रात्र झाली मखमली 

आजच मला याची 

सखे प्रचिती आली ||5||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance