काळीज दोन
काळीज दोन
या शोक यात्रेत माझ्या
आज आले कोण होते
विरहाचे अश्रू आटले हे
भेटणार काळीज दोन होते
किनारे भेटले कुणाला
माहीत नाही मला आज
शिंपल्यांच्या सजावटीने
घावावर चढले नवे साज
तुला कळावे म्हणून रे
चाळले नाही रक्त माझे
निखळावे नाही म्हणून
चाळतांना नाव फक्त तुझे
लिफाफे उघडले का
विरोध तुझा असतांना
अश्रू वेचले काजळाणे
पापण्या मलिन होतांना
रात्र काळोखात लपली
श्वास पांगले होते सारे
काजव्यांच्या मैफिलीत
रानपाखरांचे गीत वारे
तू शुद्ध झाली कशाला
विश्वास हा संपल्यावर
काजळी का प्रेम शिखरावर
काळजातले दिवे विझल्यावर

