Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance

4.0  

Rakesh More

Romance

तू माझीच आहेस

तू माझीच आहेस

1 min
12.3K


हृदयातून नेहमीच एक 

आवाज मला येतो 

तू माझीच आहेस याची 

ग्वाही मात्र देतो ||0||


तू दूर आहेस सखे 

असं वाटतच नाही 

विरहाचं विश्व मन 

कधी थाटतंच नाही 

खुणावून रोमँटिक 

दुनियेत मला नेतो 

तू माझीच आहेस याची 

ग्वाही मात्र देतो ||0||


तुझं मन माझ्या आसपास 

घुटमळतय 

मला मात्र ते सखे 

स्पष्टपणे कळतंय 

मीही ती अनुभूती  

वारंवार घेतो 

तू माझीच आहेस याची 

ग्वाही मात्र देतो ||2||


विश्वास माझा माझ्या 

प्रेमावर तर आहे 

मनात मात्र तूझ्या 

माझंच घर आहे 

कधीही डगमगलो 

नाही आजपावेतो 

तू माझीच आहेस याची 

ग्वाही मात्र देतो ||3||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance