Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance

4.0  

Rakesh More

Romance

मी पाहिलंय तुला

मी पाहिलंय तुला

1 min
11.8K


ओढ माझी सखे अशी 

मनात तुझ्या मुरताना 

मी पाहिलंय तुला बऱ्याचदा 

माझ्यासाठी झुरताना ||0||


नजर तुझी प्रीत माझी 

लपवण्यात हरली आहे 

हृदयी माझी प्रीत तुझ्या 

खरं सांग भरली आहे 

डोळ्यात तुझ्या प्रेम 

प्रतिबिंब रुपी उरताना 

मी पाहिलंय तुला बऱ्याचदा 

माझ्यासाठी झुरताना ||1||


खोटा खोटा राग तुझा 

चेहऱ्यावर दिसतो उठून 

रागातील खोल भाव 

नजरेत आणणार कुठून 

वाघिणीसारखी ही 

नजर गुरगुरताना 

मी पाहिलंय तुला बऱ्याचदा 

माझ्यासाठी झुरताना ||2||


अशी कशी पटणार 

खात्री माझी तुझ्याबद्दल 

घडवल्याशिवाय सखे 

मला तू तीव्र अद्दल 

तडफडणारं मन तुझं 

माझ्यासाठी हुरहूरताना 

मी पाहिलंय तुला बऱ्याचदा 

माझ्यासाठी झुरताना ||3||


कधी माझा चेहरा तू 

पाहिला नाहीस काय 

कधीतरी स्माईल देऊन 

बोल हाऊ आर यू, हाय 

समोर येताच रागाने 

मुद्दाम मला घुरताना 

मी पाहिलंय तुला बऱ्याचदा 

माझ्यासाठी झुरताना ||4||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance