STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

4  

Meenakshi Kilawat

Romance

कश्यास हा शृंगार"

कश्यास हा शृंगार"

1 min
543

तुला विधीने घडवूनी केली

ही सुंदरता असीम साकार

तूला प्रेम करितो मी अपार

प्रिये करशी कश्यास हा शृंगार।।


सुवंर्णचंपक तव ही काया

गजरा वेणी ही सजवाया

मुग्ध सुंगधी सुमन तुजपुढे

गुलाब,मोगरा ही जणू लाजे

फुलरानीसम दिलात बागडे  

प्रिये तुझे यौवन सदा बहार।।


तव नयनाच्या तेजापुढे

तेजहिन हे रत्न खडे

दंतपंक्तिची चमक पाहूनी

मोती हार ही फिका पडे

आभूषण सांभार कश्याला

प्रिये तनु तुझी सुकुमार ।।


क्षणोक्षणी दर्पण बघसी

रूप तुझे हे आरसपाणी

चंद्रमूखी स्वर्गाची जणू रंभा

तूजहूनी सुंदर कोण अशी

शृंगाराविना सहज करशी

प्रिये तू नयन शरे बेजार।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance