कशासाठी पोटासाठी
कशासाठी पोटासाठी
डोंबाऱ्याची पोर ती
नाचतेय होऊन बेभान
वाजतो ढोल तो तालात
होतो तमाशा जीवाचा
थाप पडते नशिबाची
तसा चाले हा नाच जीवाचा
थिरकती पावलं लय धरून
खोटं हसू गालावर आणून
खेळ एका जीवाचा करी दुसऱ्याचे मनोरंजन
करनी देवाची म्हणावी कि
आहे नशिबाचे हे भोग
वारसा कलेचा घेऊन
अंगणात दारिद्र्य नांदते
दोन वेळच्या भाकरीसाठी
घुंगरु घालुन पाय थिरकती