कसाई
कसाई
वाचा सांगलीतील एक सत्य काव्यमय कथा
मी विश्वेश्वर उर्फ शुभसंतती मांडतोय व्यथा
रेवती ही आई
आपल्याच २ वर्षाच्या 'ज्ञानदा' मुलीसाठी ठरली कसाई
सोसल्या तिनेे ज्ञानदा जन्मताना कळा
लावला नाही तिला लळा
घोटला तिचा गळा
कारण ती होती गतिमंद
म्हणूनी झाली या मातेची बुद्धी मंद
पाहूनी ज्ञानदाच्या गळ्यावर व्रण
संशयानी भरले पोलिसांचे मन
अगोदर होती ती अबोली
मग दिली तिने कबुली
तिनेच केला आपल्या पोटच्या मुलीचा खून
तिलाच तिची गतिमंदी नाही झाली सहन
खरंच दिसतं तसं नसतं
म्हणून या कलियुगी रक्ताचं नातं देखील फसतं
