करतो प्रणाम आता
करतो प्रणाम आता
सोडून अर्ध्यावरती डाव
मामा गेलात कसे निघूनी,
काहूर दाटला हृदयात
डोळ्यातून वाहे पाणी...
बसतच नाही विश्वास
तुम्ही साक्षात पुढे दिसता,
आठवणी खूप साऱ्या
गेलात हसता हसता..
ठेवून मोठा आदर्श
देवून महान शिकवण,
गेलात कसे सोडून
येई आम्हा आठवण..
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त
आम्हा अभिमान तुमचा होता,
तरुणांना लाजवेल असा
तुमचा आत्मविश्वास होता..
सर्वांच्या भल्याचे तुम्ही
स्वप्न उराशी बाळगून,
गेलात केवढे मोठे
दुःख सर्वांना देऊन..
नियतीला शिकवून धडा
कधी मागे फिरून न पहाता,
किर्ती ठेवून तुम्ही गेलात
करतो प्रणाम तुम्हा हे आता...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
