करतील मुजरा
करतील मुजरा


जर का एक झाला, मातंग समाज सारा
भानावर येतील सारे, करतील मानाचा मुजरा...
जानुन तुमच्या ह्या एकीचे बळ
दुखेल पोट त्यांचं, लागेल लई कळ
एकीने च होईल हा अन्याय दूर सारा....
एकीने च होईल खरी सत्तापालट
कित्येक राजकारण्यांची लागेल वाट
वाढेल दरारा, होईल न्याय खरा...
लागणार नाही कोणी तुझ्या नादाला
छळणार कोण या ढाण्या वाघाला?
तुझ्यापुढे कापतील सारे थरारा....
एक होऊन मांगांनी बदलावे जग सारं
साऱ्या अनीष्ठतेवर करावा प्रहार
अंधारात साऱ्या या चमकावा नवा तारा...
घडवावा मांगांनी नवा एकीचा इतिहास
प्रगती, परीवर्तन हवा मोठा विकास
ऊठ,पेट, जागा हो मांगांच्या पोरा...
लहुजी,अण्णा, फकीरा चा आहेस तू वारस
परीवर्तन चळवळीच्या धर विचारांची कास
एक होऊन सारे देऊ जय लहुजी नारा...