Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Surekha Chikhalkar

Tragedy

3  

Surekha Chikhalkar

Tragedy

कृष्णामाई

कृष्णामाई

1 min
373


सांग ग माय आमचे काय चुकले

शेतात आलीस आनंदाने

आमचे पाय थरकले

रातीत तू उंब-यात आलीस

काळजाचे ग ठोके चुकले

सांग ना ग माय आमचे काय चुकले....

पोटाला ग चिमटा काढून 

चार भिंती घर उभारले

घरभर फिरून रात्रभर तू

ग थैमान घातले

सांग ना ग माय आमचे काय चुकले.....🙏

संसाराला हातभार म्हणून

गोकुळ ग उभे केले

जीवाच्या आकांताने हांबरले

अन् पाण्यावर तरंगले

सांग ना ग माय आमचे काय चुकले..

दुदुदुडू धावणारे इवलेसे 

पाऊल चिमुकले

काळजाच्या तुकड्यालाही तू

ग तुझ्या ओटीत घेतले

सांग ना ग माय आमचे काय चुकले..

धुऊन गेले गाव सारे

निःशब्द हुंदके एकवटले

दोष देऊ कुणाला काळीज

आता करपले

सांग ना ग माय आमचे काय चुकले...

सगळीकडे पाणी पाणी वेदनेचे हजार झरे पाझरले

कोंडले श्वास ,पिचलेली मन

एकांतात हरवले

सांग ना ग माय आमचे काय चुकले...

येतील मदती हजारो किरण

डोळ्यातील पाणी मी परतले

तुझ्यामुळे जातीधर्म विसरून

सारे एकत्र एकवटले

सांग ना ग माय आमचे काय चुकले...

जाता जाता आशीर्वाद ही 

तूच दे ओठी शब्द थबकले

नाही मानली हार मी

स्वप्न उद्याचे गवसले

तरीही जाता जाता सांगून जा

सांग ना ग माय आमचे काय चुकले....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy