कृष्णाकडे विनवणी
कृष्णाकडे विनवणी
आजारी माझा भाऊ राया
जवळ आहे भाऊबीज
त्याचं वाघाचं काळीज
घेतोय करोनाशी झुंज
वेडा माझा भाऊ राया
माणसाच्या साठी
सध्या एकटाच आहे
कुणाच्या ना भेटीगाठी
नारायण माझा भाऊ राया
कधी घरला येईल
न बहिणाबाई "जय महाराष्ट्र"
कधी साद तो घालेल
जेव्हा येईल तो घरी
करेन भाऊबीज साजरी
कृष्णा तुझ्या पायी आहे
एवढंच मागणं
माझ्या भाऊरायाची
करी तू राखण
