STORYMIRROR

VINAYAK PATIL

Inspirational

3  

VINAYAK PATIL

Inspirational

कर्म

कर्म

1 min
260

कर्म करू नको

तू असे काही 

जे परतुनी घेऊन 

येईल दुष्कर्म काही 


भीती ठेव मनी 

कर थोडा विचार 

कर्माच्या आकृत्या 

जीवण रंगवी सारासार 


अविश्वसनीय शक्ती 

आहे तुझ्या मनी 

सावली रूपाने साथ

देती तुझ्या कर्माची जननी 


ठेव तुझ्या कर्मावर विश्वास

या खेरीज दुसरे काही नाही 

संकटाना नको घाबरून जाऊ 

थोडा विश्वास ठेव स्वतःवरही 


कर्माचे बीज हे 

मनोभावे पेर तू 

फळ चाखुनी बघ 

आनंदाने बहरशील तू 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational