क्रिया तशी प्रतिक्रिया
क्रिया तशी प्रतिक्रिया
भौतिक शास्त्राचा जनक न्यूटन
गेला खूप काही शिकवून
दिले क्रिया-प्रतिक्रिया चे ज्ञान
सूत्रे ही अद्भुत मांडून
जे लावाल बल तेच पुन्हा येईल
पहा त्याच वेगाने
महत्त्व क्रिया-प्रतिक्रियेचे केले
अगदी सोपे त्याने
एका दृष्टिकोनातून बघितलं तर
आपले जीवन ही काही असेच
जे पेराल तेच उगवेल
"क्रिया तशी प्रतिक्रिया" हा
सृष्टीचा नियम
आपले जसे कर्म तसे त्याचे मिळते फळ
प्रतिक्रिया म्हणजे
चांगले किंवा वाईट यांचा घेतलेला आढावा
एखादी क्रिया जिथे होते
तेथे प्रतिक्रिया ही घडत असते
सहज होणारी क्रिया असते पण
प्रतिक्रिया त्यावर मिळते
काही अपेक्षा न करता
मदत केली आपण कुणाला
काही दिवसांनी तुम्ही अडचणीत असताना धावून येईल ती व्यक्ती तुमच्या मदतीला
क्रिया तशी प्रतिक्रिया
पैशाच्या जोरावर एखाद्याचे वाईट केले त्याचे फळ ही आपल्याला कधी
ना कधी मिळणारच
अंधारात किंवा उजेडात
केलेली प्रत्येक कर्म
वापस आपल्याकडे येणारच..
जैसे ज्याचे कर्म तैसे...
नुसता पैसा धन संपत्ती
असून काय उपयोगाची
परोपकार नसेल गरिबा
विषयी करुणा नसेल
तर त्या जगण्याचा अर्थही शून्य असेल
तुम्ही स्वतः साठी किती जगता आणि
दुसऱ्यांसाठी किती याचे
मोजमाप होतच राहते
तुमच्या आचरणातून
तुम्ही स्वतःला सिद्ध करतात
चांगले आचार विचार, भगवंताला ही प्रिय असतात
आयुष्याच्या प्रत्येक क्षणात
चांगले कर्म केले
तर कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही,कुणाचे वाईट केल्यास भोगल्याशिवाय गत्यंतर,ही नाही
पापाचे फळ दुःख व पुण्यांचे फळ सुख
पापाची परिणती म्हणजे ताप
पुण्याची परिणती म्हणजे समाधान
अनाकलनीय आहे शक्ती
फळ कुर्माचे जे येती परतुनी
सावली रुपाने पाठलाग करी
वेळ कोणासाठी थांबत नाही कुणाला ठाऊक कसा जाई चांगले
कर्म करणं आपल्या हातात
बाकी सारे तो ईश्वर पाही
कर्मानेच आपला परिचय आहे
अन् त्यामुळे पाप-पुण्याचा संचय आहे
जे पेराल तेच उगवेल जगणं मरणं
तर ईश्वराच्या हातात आहे
शुभ चिंतावे, शुभ इच्छावे,
वचनी शुभ बोलावे
शुभ कर्माच्या सामर्थ्याने
करावे जीवनाचे सोने
आपला प्रामाणिकपणा परिश्रम आणि निस्वार्थ यावर आपले यश अवलंबून आहे
अहंकार गर्व कशासाठी....? शास्वत तर काहीच नाही
एखाद्याला थोडं का होईना सुख, आनंद
शक्य असल्यास मदत करू
करूया चांगली कर्म
यातच आहे जीवनाचा खरा सार आणि मर्म
लावू नका कवितेतील शब्दांचे अर्थ भावनांशी
क्रिया जशी प्रतिक्रिया
क्रियेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा
सादेला प्रतिसाद देणं महत्वाचं,
कळत नकळत सहज लिहिलं
बाकी काही नाही ....
