STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद

क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद

1 min
215

काळेभोर केस,मिश्या असे ज्यांच्या पिळदार  

हातात घड्याळ,तेजस्वी वकृत्व असे प्रभावी ज्यांचे विचार 

 डोळ्यात विलक्षण चमक,

नेतृत्व होते ते जहाल  

शत्रूसाठी बारूद, 

मित्रत्वाची होते मिसाल 

 पराक्रमी, शूरवीर 

चंद्रशेखर आझाद 


भीतीलाही करे जे भयभीत 

मातृभूमीप्रती निष्ठा,

 देशावर होती त्यांची प्रीत  

शत्रुला ही देत होते सडेतोड उत्तर

 देशसेवेसाठी समजत होते जे मरण ही बेहत्तर  


'संघर्षाच्या मार्गावर हिंसा ही मोठी गोष्ट नाही' अंगीकारत होते तत्त्व  

चंद्रशेखर आजाद होते एक वादळी व्यक्तिमत्त्व  


इंग्रज ही त्यांना 

अडवू नाही शकले 

संघर्ष केला असा 

तिरंगाची शान जपण्यासाठी  

वेळप्रसंगी जुमानले नाही 

मरणाला पुन्हा अमर होण्यासाठी  


 सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशांनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' ची

 केली स्थापना 

 'इकंलाब जिंदाबाद चा नारा' दिला जुलमी इंग्रजी सत्तेला धडा शिकवण्यासाठी संघटित केले मातृभूमीच्या वीर सुपुत्रांना


 इंग्रजांच्या हातून मरण्यापेक्षा स्वतःवर गोळी झाडणे केले पसंत दिली आपल्या प्राणाची आहुती धारातीर्थी पडतांना विलक्षण समाधान,देशाचे नाव होते

 ज्यांच्या ओठी धन्य ती माय जिच्या आला हा वीर पोटी

जन्मताच होते जे आझाद, संपूर्ण जीवन जगले आझाद 

मृत्यूलाही कवटाळले ह्रदयाशी ज्यांनी होऊन आझाद

थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी आझाद.. 


शेवटी एवढेच..


आओ झुक कर सलाम करे इनको 

जिनके हिस्से मे ये मुकाम आता है 

खुशनसीब होते है वो लोग

 जिनका लहू इस देश के काम आता है..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational