STORYMIRROR

Prem Gaikwad

Tragedy Action Inspirational

3  

Prem Gaikwad

Tragedy Action Inspirational

क्रांती

क्रांती

1 min
241

आज सर्वांना दिसले

इथे कसे आहेत वारे,

जय महाराष्ट्र, जय भारत

कसे द्यायचे नारे...


किती भ्रष्ट यंत्रणा इथली

किती आहे अलबेल,

तुमच्या आमच्या इब्रतीचा

चालतो किती खेळ..??


सांभाळा गुरुजी स्वतःला

इथे सारंच आहे धोक्यात,

ज्ञानाचा प्रकाश विझवण्याचा

प्लॅन असावा संकरीत डोक्यात


 वारे सर्वांना डिसले 

गुरुजी द्यावी घ्यावी लाच,

क्रांती हवी इथे

आहे एक उपाय हाच


पेटवा मशाली

करा दूर अंधार,

 डिसले, वारे 

वेळ झाली फार


ज्ञानदीप विझण्या आधी

गुरुजी घ्यावा अवतार,

क्रांतीची वेळ आहे

आता नको उशीर फार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy