कप - बशी
कप - बशी
तू कप - मी बशी
समावून घेते तुला ओंजळीत अशी..
प्रत्येकाचा करताना आदर
आपणांस केल जातं सादर..
कधी कधी तू ओसंडतोस..
माझ्या ओंजळीत सामावतोस..
तेंव्हा मन माझं खूप भारावत..
तोवर दुसरच कुणीतरी तुला भुरकत..
सारेच लावतात तुला ओठाला
आणि मला मात्र सारतात बाजूला..
दिवसा गणिक बदल होता होता
तू झालास मोठा.. मला मात्र आता टाटा..
कपातून बारस झालं तुझं मग
ओळखला जाऊ लागलास " मगं "
पूर्वी माझ्याशिवाय नव्हतं तुझं अस्तित्व
आता माझ्याशिवाय तूच करतोस नेतृत्व..
होऊ दे दिवसागणिक तुझी प्रगती अशी
पण काही केल्या विसरू नको नाती आपली
तू कप आणि मी बशी..
