Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Surekha Chikhalkar

Tragedy

4  

Surekha Chikhalkar

Tragedy

कोरोनाची माहामारी

कोरोनाची माहामारी

1 min
228


ना झाले साजरे मरण माझे

दूर देशी चालले मी गावा

ना गेला सांगावा,ना नात्यांचा गराडा

कसा घेऊ राम राम कुणा ना ठावा //


बेगडी ती नात्यांची नाळ,

दिखाव्यासही न उरली

ना घातली आर्त साद,

मने रक्तबंबाळ झरली. //


ना भडाग्नी ची आस ती

ना शेवटचा घोट पाजले पाणी

ना पुण्याई कामास आली

 ना कमावलेली नाणी //


कोण आई ,कोण बाबा 

जो तो भितो आपल्या जीवा

कोणी कोणाचे ना राहिले

कुठली नाती , ना वंशाचा दिवा //

 


महामारी ती रोगराई

सरणाची रास लावून गेली

कोणी ना कुणाचा या जगी

भ्रमाचा भोपळा फोडून गेली //


भरला रोग्यांचा बाजार जणू

भेदभाव ना उरला मरणासाठी

घेतला वाशिल्याचा आधार तेंव्हा 

विकतच्या श्वास अन् सरणासाठी //


फास का पडतोय भिऊन गळी

धडपडतो जो तो जगण्या सारखं,

नको ते आता बेवारशी मरण

नात्यालाही झालं नातं पारखं //


चुकले माकले आमचे काही

एकच आस ती देवा तुझ्या ठायी

भरोसा आता तुझ्यावरी 

तारण अन् मरण ही तुझ्या पायी //



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy