कोरोनाचा नायनाट..
कोरोनाचा नायनाट..




स्वच्छतेचं महत्त्व जाणा,करा सुरुवात
या कोरोनाचा आता आपण करू नायनाट...
ओसाड हे रस्ते सारेच कोणी कुत्र नाही
हॉटेल,दुकान,मॉल,थियटर बंद सारं काही,
शाळा, कॉलेज,ट्युशन बंद, सारेच बंद घरात....
शिकताना,खोकताना,सारे घ्यावी खबरदारी
जागरुकता ठेवा, नको भरोसा अफवावरी,
घराबाहेर जाणे टाळा, गर्दी जिथं दाट...
पोलिस, डॉक्टर, प्रशासनाला करावी मदत
प्रवासही टाळावा साऱ्यांनी पहा जनहित,
दिसता लक्षणं कोरोनाचे व्हावे लवकर आडमिट...
शिंका,सर्दी,ताप, खोकला,घशाचा त्रास
फुफ्फुसे, श्र्वसन विकार होता भेटा डॉक्टरांस,
जगावरच आलंय बरं हे संकट लई मोठं...
साबण, डेटॉल वापरा, नेहमी हात स्वच्छ धुवा
तोंडाला मास्क, रुमाल वापरायला च हवा
उपाय यावर नाही अजून ही ठेवा हे लक्षात...
या कोरोनाचा आपण सारे करु नायनाट.