कोरोना
कोरोना
काय नियतीने क्रूरचेष्टा ही केली
कशी सकलांची भंबेरी उडविली(१)
वटवाघळांतूनी संक्रमित झाला
आणिक आमुच्या बोकांडी तो बैसला(२)
प्रमाद झाले सरकारचे ही काही
परि जनताही काsही कमी नाही(३)
रुप कोरोना सदा बदलीत राही
लस शोधण्या गर्क शास्त्रज्ञ मंडळी(४)
आकडा वाढतो म्रुतांचा क्षणोक्षणी
रुग्णालये ही पहा तुडुंब भरली(५)
जैविक युदध हे अद्रुश्य विषाणूशी
सरण्याची याच्या कालमर्यादा नाही(६)
संपला पैका लोकांच्या कनवटीचा
काय घालावे लेकरांना प्रश्न मोठा(७)
वाहतुकही सत्वरी बंद केली
<p>लेकरांना घेऊनी जनदिंडी निघाली(८)
चालून ऊर फुटूनी कितेक मेली
परदेशियांस आणण्या विमाने गेली(९)
इथेही पैशाचा झाला रुबाब मोठा
वाट तुडवूनी पडल्या पायी भेगा(१०)
कोविड योद्धे प्राणपणाने लढती
साष्टांग प्रणिपात अमुचा तयांसी(११)
काही मुढ ऐसे मुद्दाम उंडारती
संक्रमक होऊनी वेठीशी धरती(१२)
लवकरी संपावे हे समर आता
आबालव्रुध्द ची आतुर फिरायाला(१३)
ऐसी जादुची कांडी एकची फिरावी
कोरोनाची पुरी नायनाट मोडावी(१४)
ईश्वर आहे याची खातरी पटावी
साऱ्यांची मान विनयतेने झुकावी(१५)