STORYMIRROR

Geeta Garud

Others

4.2  

Geeta Garud

Others

आई तुझ्या कुशीत

आई तुझ्या कुशीत

1 min
23.4K


आई तुझ्या कुशीत

शिरावसं वाटतं

पदर तुझा पांघरून 

निजावसं वाटतं


आयुष्यभर पुरुन उरतील

असे तुझे संस्कार

सहजच कोरलेस तु मनावर

माझ्या सुंदर सुविचार


का गं आई

मुलीच होतं लग्न?

का गं आई

सोडावं लागतं तिला घर?


कशा ग आई

तु निभावल्यास साऱ्या भुमिका

आई,पत्नी,मुलगी,बहीण,

नणंद,सासू,वहिनी..या सार्या


मला तर न आई

हे लयच किचकट वाटतं

तुझी आठव येताच

डोळ्यांत टचकन पाणी येतं


झाले जर आई

मी परत एकदा लहान

शिरीन तुझ्या कुशीत

अन् निजेन गाढ


तुझ्या कुशीत मला

मस्त निर्धास्त वाटतं

मन माझं होतं

पिसासम हलकं


आई तुझ्या कुशीत

शिरावसं वाटतं

पदर तुझा पांघरून

निजावसं वाटतं.


Rate this content
Log in