सागरकिनारा
सागरकिनारा
1 min
23.8K
सागराची गाज ही
गुज सांगे कानात
मोतियांचे नुपूर
लाटांच्या पावलांत
चिंब ओलेती वाळू
निळ्याशा स्पर्शाने
सोनेरी किरणांची
सरी कंठाशी शोभे
शिंपल्यांचा मेखला
काय साज वर्णावा
तिची कटी चुंबण्या
अर्णव उधाणला
असा धसमुसळा
आला तसाच गेला
वाळू मुकअधीर
मिठीत सामावया
नादावतो पयोधि
भोळ्या रेतीस असा
सरीतेचा पती हा
कसा रे भटकला
सत्य वाळू उमजे
तिचे प्राक्तन राधा
रत्नाकर श्रीरंग
तिज सावळबाधा