राजसा...
राजसा...


राजसा वरिले तुला
पापण्यांनी आज
मोहरला शहारला
गालीचा गुलाब
भारदस्त आवाजाने
पाडलीस छाप
मिशीतले सौम्य हासू
करिते घायाळ
घातली कितींनी तुला
रुपाची मोहिनी
तुझ्या माझ्या संसाराच्या
रेखिल्या मी ओळी
सावळबाधा ही तुझी
झाली मला आज
काळजात साठविला
रांगडा रुबाब
रुंद खांदे, भव्य छाती
मनास मोहवी
स्वप्न माझे सत्य भासू
लागे सांजवेळी
जळी काष्ठी पाषाणी
दिसे तुझी छाया
अनावर जाहले मी
होण्या तुझी भार्या