STORYMIRROR

Geeta Garud

Tragedy

3  

Geeta Garud

Tragedy

वस्ती पलिकडची

वस्ती पलिकडची

1 min
11.9K

पाऊलवाट भिन्न त्यांची

नाईलाजास्तव पत्करलेली

हौस का असते कुणाला

शरीराचे प्रदर्शन मांडण्याची


गरिबीपुढे हरलेल्या त्या

वेश्यावस्तीत भरती झाल्या

वखवखल्या शरीरांची

भूक त्या भागवू लागल्या


कशासाठी? कोणासाठी?

चालले होते पोटासाठी

शरीराचा बाजार मांडून

कुटुंबाची चूल पेटवण्यासाठी


विषाणूच्या भीतीने आताशी

पावलं तिकडं वळत नाहीत

पिसाटलेली शरीरं आताशी

वस्तीत त्या फिरकत नाहीत


बंद झालीय रात्रीची मेहफिल,

ती ओठांची भडक लाली, 

भरलेले मद्याचे प्याले अन् 

तालावर चालणारी नाचगाणी


डोळ्यांपुढे अंधार तयांच्या

मार्ग पुढला दिसत नाही

किती दिवस चालणार असं

जगायचं कसं सुचत नाही


माणूसच आहेत त्याही

हेच मुळी विसरतो समाज

देऊनी त्यांना दुषणं हजार

चेहऱ्यावर मिरवतो सज्जनभाव


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy