कोरोना जाशील का रे?
कोरोना जाशील का रे?
टाहो आईचा ऐकून
बेचैन मन हे झाले
तुझ्यामुळे गेला बळी
कोरोना जाशील का रे?
बंद पडली ही दुकाने
बंद सारी कारखाने
हैरान जग तुझ्याने
कोरोना जाशील का रे?
उपासमारीची वेळ
गरीबांवर आली रे
तुझ्यामुळे आला काळ
कोरोना जाशील का रे?
कोरोनाचा कहर हा
एकमेका न पाही रे
नको आता ताटातूट
कोरोना जाशील का रे?
पुरे तुझा धुमाकूळ
थकलोय आम्ही सारे
लढून तुझ्याशी आता
कोरोना जाशील का रे?
