STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

कल्पनेचा कुंचला!

कल्पनेचा कुंचला!

1 min
303

रंगवूनी चित्र कल्पनेत 

रंगात बुडवून कुंचल्यास 

साकारीन नवा निसर्ग 

पुसून काढीन प्रदूषणास  


कल्पनेच्या कुंचल्याने

ढग नभात रंगवेन 

जिथे ना पडे पाऊस 

तिथे घनघोर वर्षा पाडेन 


सदा हिरवळी रंगवून वाटे मज

पशू पक्ष्यांनाही आनंद द्यावे

कधी ही न पडता कमतरता 

मानवास समाधान व्हावे


मनास वाटे, सुंदर घर बनवून 

निराधारास आधार द्यावा 

स्वप्न पूर्ण करण्यास त्यांचे 

जादूचा कुंचला हातात घ्यावा 


अशी ही जादूची किमया 

खरीच आली जर माझ्या हाता 

आयुष्य वाढवण्या सर्वांचा 

कुंचल्यास बनवीन खरा दाता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational