Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

कल्पना चावला

कल्पना चावला

1 min
372

असे भारतीय वंशाची

अंतराळवीर शूर महिला

होती हरियाणाची सुपुत्री

नाव तिचे कल्पना चावला ||

जागतिक पातळीवर

उमटवे कर्तुत्वाचा ठसा

 सर्वभारतीय स्त्रियांनीही

घ्यावा रणरागिनीचा वसा ||

अमेरिकेचे नागरिकत्व

असूनही ओळख देई

भारतीय कन्या अशी

तिचा आदर्श सर्व घेई ||

स्वतःचेच होते प्रतीक

आकाशाचे चित्र रेखाटणे

उराशी बाळगलेले स्वप्न

सत्यात तिने उतरविले ||

घेऊनी पदवी एरोनॉटिक्स

हुशार अभियांत्रिकी झाली

एम .एस .परीक्षेतही तिने

यशाची परंपरा राखली ||

राकेशशर्माचा आदर्श ठेवून

शक्तिशाली मोठे उड्डाण केले

कोलंबिया असे नाव यानाचे

अवकाशात उंच झेपावले ||

तांत्रिक बिघाड होऊन

यान हवेत नष्ट झाले

अवकाशात गेली विरून

स्वप्न अधुरे तिचे राहिले ||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational