STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Tragedy

4  

Prashant Tribhuwan

Tragedy

कळलेच नाही मला

कळलेच नाही मला

1 min
513

कळलेच नाही मला

मंद ती मायेची झुळूक

कधी निघून गेली

सावराण्या मजला

बाबांनी साथ दिली


कळलेच नाही मला

त्या आईचे वात्सल्य

आणि तो प्रेमाचा पदर

तरीही जन्म दिला म्हणोनी

सदैव मनी तिचा आदर


कळलेच नाही मला

होता दुःख या मनाला

कुणाच्या गळ्यात मी पडाव

सांगून सारे काही मनातलं

कोणाजवळ मी रडाव


कळलेच नाही मला

का तू सोडून गेली

मला जन्म देऊनी

सांग कसे जगावे मी

तुझ्या प्रेमाविना राहुनी


कळलेच नाही मला

का तो भगवंत माझ्याशी

इतका निष्ठुर झाला

ऐन गरजेच्या वेळी त्याने

माझा मायेचा हत नेला


कळलेच असते मला

आज माझ्या साथीला

जर का माझी आई असती

तिन्ही लोकांमध्ये भाग्यवंत

माझ्याहून कोणी दुसरी नसती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy