STORYMIRROR

Prashant Kadam

Tragedy

4  

Prashant Kadam

Tragedy

कळेना कसा!

कळेना कसा!

1 min
154

कळेना कसा हा गुंता सोडवू मी

किती यातना या, बळ आणू कसे मी


जीवनाची ही होडी, गर्तेत बुडाली

दिखावूपणा हा, उगा मिरवला मी

किती यातना या, बळ आणू कसे मी

कळेना कसा हा गुंता सोडवू मी


अशी दशा झाली, दुर्दशेप्रमाणे

नको त्याच चूका, केल्या पुन्हा मी

किती यातना या, बळ आणू कसे मी

कळेना कसा हा गुंता सोडवू मी


पुन्हा जीवनातला, आनंद हा खुंटला 

पुन्हा झालो रिता, कसा सावरू मी

किती यातना या, बळ आणू कसे मी

कळेना कसा हा गुंता सोडवू मी


कळेना कसा हा गुंता सोडवू मी

किती यातना या, बळ आणू कसे मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy