कितीदा नव्याने
कितीदा नव्याने
कितीदा नव्याने तुला हे कितान गावे,
एकदा तरी मला तू समजून घ्यावे
कितीदा केली तुझी विनवणी,
पण नेहमीच चालली तुझीच मनमानी
पुरे झाले आता असे फुगवे अन रूसवे,
नको गाळत बसू डोळ्यातून आसवे
डोळ्यात अन कानात अंतर चार बोटांचे,
तुझे नि माझे हे नाते निखळ प्रेमाचे
कितीदा नव्याने देवू वचन मी तुजला,
तुजविण दुसरे कोणी नाही मजला
कितीदा नव्याने शपथ घेवू देहाला लावूनी हात,
सोडणार नाही मी तुझी अशी अर्ध्यावर साथ
कितीदा नव्याने तुला हे कितान गावे,
एकदा तरी मला तू समजून घ्यावे
