Kiss day...!
Kiss day...!
किस डे म्हणजे मुका दिन
वाजू लागते उगाच बीन
मुहूर्त खरे साडे तीन
पण आजचा आहे भलता क्लीन
सार पारड दुसऱ्या बाजूस कललेलं
मन जणू साऱ्याला मुकलेलं
समर्पणात पुरत झुकलेलं
तरीही आशेवर पूर्ण तरलेलं
आजचा दिवस भाग्याचा
जणू कपिला शष्टीच्या योगाचा
सार भाग्य ओठावर येण्याचा
अन हवं हवं देण्याचा अन घेण्याचा
सार कस स्वप्नवतच म्हणायचं
वाजलं तर वाजलं नाहीतर मोडून खाल्लं
होणार होत असत ,अन चांगलंच होत
किस डे च मोलच अमूल्य असत
जुळले तर जुळून जात
आणि नवीन नात जोडलं जात
नाहीतर जोडल नाहीतरी सुद्धा
जून नातच पुन्हा घट्ट होत
म्हणून किस डे कधी मिस होऊ नये
कपिलाषष्ठीचा योग कधी चूकु नये
समजूतदार मित्र मैत्रिणींचे
मैत्रीचे नाते कधी तुटू नये....!

