STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Action Inspirational

किर्ती भिमाची...

किर्ती भिमाची...

1 min
267

किर्ती आहे भिमाची, साऱ्या या जगात

आहे भीम आज आमच्या कोटी हृदयात


     जन्मूनी अस्पृश्य जातीत

     भीम झाला कीर्तीवान,

      होणार नाही जगी या

     भीमासम इथे विद्वान.

दिली धम्मदीक्षा जगाला, पेटवून धम्म ज्योत...


      काळाराम मंदिर प्रवेश

      माझ्या भीमाने केला,

      कोटी जनांचा उद्धार

      भीमामुळेच झाला.

दिले न्याय, हक्क, अधिकार, त्यांनी संविधानात...


      अस्पृश्य, बहुजनांचा

      भीमच खरा वाली,

      क्रांती खरी जगी या

      भिमानेच मोठी केली.

बनविले माणूस आम्हा, होतो अंधारात...


       परिवर्तन जगी या

       भिमानेच खरे केले,

       महामानवामुळे या

      चवदार पाणी झाले

दिली क्रांतीची मशाल, आमच्या या हातात...


      शिक्षण, संघटन, संघर्षाचा

      मंत्र दिला आम्हाला,

      झुकवून चरणी माथा,

      करु वंदन भिमाला.

गाऊ आरती, पोवाडे, गाऊ या भिमगीतं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action