किमया
किमया
पहा किमया शब्दांची
येती ओठी मनातून
लेखणीच्या मदतीने
शब्द ठसे काव्यातून.....१
शब्द सरी बरसल्या
झाला वर्षाव काव्यांचा
हर्ष मनात दाटला
क्षण आला आनंदाचा.....२
मैफलीत रंग चढे
शब्द सूर जुळवता
लोक प्रशंसा मिळते
गाणे सुंदर म्हणता.....३
लेखकाच्या लेखणीला
भाग्य असे ते शब्दांचे
अलंकारी शब्द साज
मिळे प्रियता कथांचे.......४
साहित्याच्या संमेलनी
शब्द सरी कोसळती
भावविभोर होऊनी
मने श्रोत्यांची मोहती.....५
