STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Tragedy

3  

Prashant Tribhuwan

Tragedy

किळस

किळस

1 min
145

किळस येते आज समाजातील त्या लोकांची

जे फक्त भोगला आपले सर्वस्व मानतात,

वासनेचा बाजार मांडलाय इथे जागोजागी

शरीर भोगातच आपले सुख जाणतात !


किळस येते आज समाजातील त्या लोकांची

जे कुत्र्यांना आपल्या घरात ठेवतात,

आणि जन्मदात्या आई वडिलांना 

त्यांचे उपकार विसरून वृधदाश्रमात पाठवतात!


किळस येते आज समाजातील त्या लोकांची

ज्यांची जीभ भरली वासनेच्या लाळेने,

त्यांच्यामुळे तर समाजही घाबरतो आज

हलवण्या मुलींच्या जन्माचे पाळणे !


किळस येते आज समाजातील त्या लोकांची

जे समजतात बाईला आपले खेळणे,

आपल्या हौसेसाठी तिला रात्रंदिन

गुलामावाणी आयुष्यभर जाळणे!


किळस येते आज समाजातील त्या लोकांची

जे स्वतःला माणूस म्हणून घेतात,

आणि धर्माधर्मासाठी मानवधर्म विसरून

एकमेकांचा जीव घेता आणि देतात!


किळस येते आज समाजातील त्या लोकांची

जे जगण्याला समजतात मिळालेली सजा,

कशी मिळेल मग त्यांना या जगतातून

जीवन संग्राम लढल्याविना रजा ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy