STORYMIRROR

Varsha Patle Rahangdale

Romance

3  

Varsha Patle Rahangdale

Romance

खरं प्रेम

खरं प्रेम

1 min
272

भेट आपली संपली तरी

नातं आपल संपणार नाही

मनाच्या अथांग सागरात

तु कधी हरवणार नाही


वाटतं नाही जावे सोडून तुला

पण जरा त्यालाही कारण आहे

तुझ्याशिवाय सुखी राहणे

जरा अवघडच जाणार आहे


तुझ्या मुक्या भावनांना

जपून ठेवणार आहे मी

काळजाच्या तुकड्यांना

तुटू देणार ना कधी मी


प्राण नको मला तुझा

फक्त तुझा जीव लाव मला

प्रेम विसरण्याची फक्त

हीच अप्रतिम आहे कला


सांजवेळी कळत नकळत

आठवण तुझीच येणार

एकांतवेळी ओसरीत बसून

वाट तुझीच मी बघणार


तुला विसरणे अशक्य आहे

मग ओळखीचा प्रश्नच नाही

जेव्हा भेटशील मला तेव्हा

मध देईल प्रेमाची ग्वाही


माझ्या नयणात प्रत्येक वेळी

फक्त तुझेच अश्रू असणार

डोळे न बोलताच सख्या

तुला सर्व काही सांगणार


प्रेमात पराभव नसतो कधी

हक्क तुझाच फक्त असणार

शपथेवर प्रेम केल जात नाही

नेहमी तुच माझा असणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance