STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Inspirational

3  

Author Sangieta Devkar

Inspirational

खरे देशभक्त

खरे देशभक्त

1 min
220

15 ऑगस्ट, 26 जानेवारी आली की,

सलग आम्ही कामाला सुट्टी टाकतो.

घरी टी व्ही समोर चहा चे घुटके घेत,

भारतीय जवानांची परेड बघतो, आम्हीच तर,

खरे देशभक्त असतो

क्रिकेटची मॅच जिंकली की दणकून फटाके उडवतो.

बिइंग ह्यूमन चा टिशर्ट घालून मिरवतो.

देश काय रस्ता काय आपलाच म्हणून,

जागोजागी गुटख्याची पिचकारी मारतो.

खरे देशभक्त तर आम्ही असतो.

स्वातंत्र्य सेनानीच्या जयंती, पुण्यतिथी ,

आवर्जून लक्षात ठेवतो, फोटो पोस्ट करतो.

तिथे सीमेवर जवान जीवाची बाजी लावतो.

हाऊज द जोश म्हणत आम्ही उगाच मिरवतो.

लताजीची गाणी एक दिवस लावतो.

परस्त्री कडे वाकड्या नजरेने बगतो.

गड किल्ले आमच्या नावानी रंगवतो.

आम्हीच तर खरे देशभक्त असतो.

साळगावकर, कौस्तुभ राणे व्हायला दम लागतो.

आम्हीच तर खरे देशभक्त असतो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational