Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shital Yadav

Inspirational

4  

Shital Yadav

Inspirational

खरा पुरस्कार

खरा पुरस्कार

1 min
14K


घेई कन्या जन्म वंशा

नसे आनंदाला पार

तिच्या स्वागताचा असे

हाच खरा पुरस्कार ।


करुनिया परीक्षण

नका मानू तिला भार

द्यावा सन्मान अपार

हाच खरा पुरस्कार ।


हुंड्यासाठी जिथेतिथे

गळफास घेई नार

आपुलकी स्त्रीत्वासाठी

हाच खरा पुरस्कार ।


नारी दुर्गा,नारी लक्ष्मी

जीवनाचा अलंकार

करु यथोचित मान

हाच खरा पुरस्कार ।


ममतेने घडवू या

देऊ जीवना आकार

स्वप्ने नेई पूर्णत्वास

हाच खरा पुरस्कार ।


भाग्यवान समजावे

ठाम असावे विचार

मुलीलाही माना शुभ

हाच खरा पुरस्कार ।


जिंके यशाची शिखरे

कीर्ति मिळे भरमार

निनादतो जयघोष

हाच खरा पुरस्कार ।


Rate this content
Log in