STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

3  

Bharati Sawant

Inspirational

खेळ आयुष्याचा

खेळ आयुष्याचा

1 min
336

खेळ आयुष्याचा 

असा कसा मांडला रे

खेळ आयुष्याचा देवा

होतो सुखासमाधानात

वाटला का तुलाच हेवा

आले जीवनात त्यांच्या

महामारीचेच घोर संकट

बंदिस्त राहिलो घरातच

झाला सारा मार्ग बिकट

गमावलेत आप्त मित्रही

कीडेमुंग्यावाणी हा जीव

फासे नशिबाचे उलटलेत

कधी येईल रे तुला कीव

काय होतीच चूक बाप्पा

नेलेस हिरावूनी मायबाप

शिक्षा मिळाली लेकरांना

काय केलेले त्यांनी पाप 

कष्ट करूनी मानवप्राणी

होता जगत सुखी जीवन

आला महामारीचा फेरा

दिले नाहीस तू संजीवन

झालीत इवलीशी ही पोरे

मायबापाविनाच अनाथ

कसे काढावे आयुष्य सारे

कोणी बनेल त्यांचा नाथ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational