खेळ आयुष्याचा
खेळ आयुष्याचा
आयुष्याचा घाट मांडला होता
खेळूनी पुरे झाले आता ,
तु येऊन तर बघ जरा
ये अरे तू ये ओ मृत्यु एकदा
एक डाव खेळुनि रंगेल तुझ्या सवे
तुलाही जरा भाव देतो
करूण हृदयी जपत वेदना
हजार तळपत्या घाव खात्या
ओरसरत्या आसवांना आता
बरस्त्या सरींचं नाव देतो
दुखतंय मनाची घालमेल आता मांडावी कुठं
अंतरी दाटत्या वेदनेची कळ मुकी
पोचली जिव्हावरी तरी ना
ओठातून शब्द फुटे ,
जगलो कायम खोटं हसू घेउनी
खोट्या अनेक चेहऱ्यांनी
म्हटले थोडंसं दुःखालाही
जगायला वाव देतो
