STORYMIRROR

Mahananda Bagewadi

Inspirational

3  

Mahananda Bagewadi

Inspirational

खांब

खांब

1 min
322

बायकांची असते

 उगाचच धडपड,

दिवसभर फिरतात 

जणू भिंगरी पायात,

कधी किचन कधी हॉल

 ताबा पूर्ण घरात,

स्वयंपाक धुणीभांडी 

करतात अगदी चोख,

 घरातल्या हिशोबात ही

 अगदी रोखठोक,

 तरीही करून 

इतकी धडपड,

सकाळी वॉकिंगला

 जायची तडफड, 

जिथं तिथं एकच टेन्शन,

 वजन कमी करायचं मिशन,

 वाढलं माझं वजन बाई

 प्रत्येकाची हीच बडबड,

 दिवसभर करतात धावपळ किती,

 वर एक्सरसाइज नाही याची भीती, 

कसं सांगू बाई तुला

 तु मुलांची सरस्वती, 

नवऱ्याची अर्धांगिनी,

 घरातली नांदती लक्ष्मी तू, 

तू जाड तू बारीक, 

कशीही असली तरी

तुझ्या शिवाय घर नाही, 

नको घेऊ टेंशन 

तुला कोणाची सर नाही,

 खा पी मज्जा कर 

तुझ्यावरच आहे सगळं अवलंबून,

 नको फिगरचा करू विचार 

जग आनंदाने सत्य स्वीकारून....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational