केव्हातरी पहाटे...
केव्हातरी पहाटे...
केव्हातरी पहाटे सूर्य उगवत हाेता,
त्याच्या नशीबी ताे दिसत नव्हता...
केव्हातरी पहाटे चिमणीचा चिवचिवाट,
राेजच्या जीवनात ऐकू येत नव्हता कलकलाट...
केव्हातरी पहाटे पडते गुलाबी थंडी,
राेजच्या दिनक्रमात विसरताे ही हुडहुडी...
केव्हातरी पहाटे पडत जाताे पाऊस,
बाहेर ताे निघताच वाजवताे नकाराची कूस...
