केव्हा भेट होते
केव्हा भेट होते




रोज भेट होत होती
तेव्हा काही वाटत नव्हतं
जेव्हा तू दूर गेली
तेव्हा मला राहवत नव्हतं
मी समजू शकलो नव्हतो
मला तुझ्याशी प्रेम आहे
कळत नकळत मी
तुझाच झालो आहे
माझ्या मनाला आता
आवरणं कठीण आहे
तुझ्या प्रेमामुळे आता
सावरणं कठीण आहे
रोज तुला होता
सुर्योदय पाहण्याचा छंद
तेव्हा मला समजला नाही
तुझ्या प्रेमाचा गंध
मी पाहिले होते
सौंदर्य डोळ्यात तुला
तेव्हा दिली होती तू
प्रेमाची कबुली मला
ओठावरचे तुझे शब्द
तुझ्या डोळ्यात दिसत होते
मी न्याहाळत होतो डोळे
पण मला काही कळले नव्हते
आता वाट आहे तुझी
की केव्हा भेट होते
तुझ्या त्या जुन्या स्पर्शाने
केव्हा पहाट होते