STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy

3  

sarika k Aiwale

Romance Tragedy

कदर...?

कदर...?

1 min
229

अबोलीची सय सावली 

गंधित वारा ही सुगंधी

बेभान मनाची काहुरी

बहरास सांज ती दिवानी


कोवळ्या उन्हात झिरली

सावली मनास ना कळली

बेधूंद वाहिली तीरावरी

बंदीस्त उदायाची किरण ही


वेड्या त्या प्रित लाटेची 

सागरा कधी न कळली 

मनी वसे साथ जाणुनी 

जगावेगळी जगे प्रिती 


भास आभास सारे तुझ्यात 

आस प्रयास फक्त इथेच 

जगण मरण जाणिले तुलाच

श्वास विश्वास फक्त तुच 


बंदिस्त जाहली काहिली ती

बंद कवाडे मनाची समजूत 

भावनेच्या वेरूला गाळूनी 

जगण्याची सवय ती केली 


क्षण थांबला त्याच जागी 

सांज कोवळी जिथे ल्याली 

मनाने हरले त्याच क्षणी 

भावरंग उमटली त्या नभाळी 


सांज दुरावली काळजात ही

काहुरली ती काळजी कसली ??? 

लागे बंध जे तोडले जाणुनी 

भावनेची कदर तया कसली??? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance