STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Abstract

4  

SURYAKANT MAJALKAR

Abstract

कधीच कळले नाहीच

कधीच कळले नाहीच

1 min
229

कधीच कळले नाही

प्रेम मम् हृृृदयातले

भाव माझ्या डोळ्यातले

कधी वाचले नाहीस (१)


किती दिवस एकत्र बागडलो.

किती रात्री एकत्र घालविल्या.

निर्व्याज प्रेम हृदयातले

कधी जाणले नाहीस (२)


नित्य जोखीत गेलीस

तनतृप्तीच्या परिमाणात

पल्याड भावनांचे

कधी मानले नाहीस. (३)


अतृप्त आत्माची खंत

नित्य शब्दात जाणवेल.

शब्दाचें सामर्थ्य

मग तुलाही कळेल. (४)



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract